Savitri Forum,Pune.

Savitri Forum,Pune. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Savitri Forum,Pune., Legal Service, Savitri Forum, Pune.

अभिजात मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन गोष्टी वाचवायच्या असतील आणि त्या वाचल्याच पाहिजेत असे ज्याला वाटते त्यांनी आवर्ज...
04/02/2026

अभिजात मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन गोष्टी वाचवायच्या असतील आणि त्या वाचल्याच पाहिजेत असे ज्याला वाटते त्यांनी आवर्जून पहावा असा चित्रपट म्हणजे..
“क्रांतीज्योती विद्यालय,मराठी माध्यम."
हा चित्रपट आज सावित्री फोरम तर्फे सख्यांना दाखविण्यात आला.
लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिती जोग आणि सर्व कलाकार यांचे अभिनंदन कारण,
मराठी भाषा आणि मराठी शाळा हा खरंतर गंभीर विषय असूनही इतका हलका फुलका चित्रपट काढला आणि त्यामुळे हा विषय सर्वांच्या च मनात जागरूकता निर्माण करतो... विचार करायला भाग पाडतो.
सर्वच कलाकारांचे अभिनंदन.. सर्वांनी धमाल भूमिका केल्या आहेत.नकळत आपण आपल्या शाळेच्या दिवसातल्या सोनेरी आठवणींच्या जगात फेरफटका मारून येतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी शाळेतले शिक्षण आणि आपली माय मराठी भाषा या बद्दलचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत ही अपेक्षा. 😊

सावित्री फोरम च्या सख्यांचे हळदी कुंकू, "कल्याण ज्वेलर्स, कर्वे रोड" येथे उत्साहात साजरे झाले.या निमित्ताने सौ. श्रेया व...
22/01/2026

सावित्री फोरम च्या सख्यांचे हळदी कुंकू, "कल्याण ज्वेलर्स, कर्वे रोड" येथे उत्साहात साजरे झाले.
या निमित्ताने सौ. श्रेया वैद्य यांनी रत्ने व खडे या बद्दलची उपयुक्त माहिती दिली.
या व्यवसायात त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे. आपले लाडके सुपरस्टार अमिताभ बच्चन जी यांनी सुद्धा सौ. श्रेयाजींचा सल्ला घेतला आहे.
(सौ. श्रेया वैद्य यांचा मोबाईल नंबर- 80876 14516.)
श्री. सुमित यांनी कल्याण ज्वेलर्स च्या भिशी सह अनेक योजनांची माहिती दिली.
गप्पा आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

30/09/2025
नवरात्रीच्या निमित्ताने काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी सावित्री फोरम तर्फे “नवदुर्गांचा सन्मान” करण्यात आला.तसेच श्री सूक्त...
25/09/2025

नवरात्रीच्या निमित्ताने काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी सावित्री फोरम तर्फे “नवदुर्गांचा सन्मान” करण्यात आला.
तसेच श्री सूक्त पठण करण्यात आले.
नेहमीप्रमाणेच कार्यक्रम खूप छान आणि त्याचबरोबर मनाला भिडणारा झाला.
नवदुर्गांप्रमाणे अनेक रूपं घेऊन स्त्री आपले अस्तित्व दाखवून देते हे या नऊ जणींनी दाखवून दिले आहे.
प्रत्येक दुर्गेची कहाणी ऐकतांना सर्वच जण अतिशय भावुक झाले होते.
कितीतरी वाईट, खडतर प्रसंगांना तोंड देत, त्यावर मात करत तितक्याच जिद्दी ने, ताठ मानेने फिनिक्स पक्षासारखी घेतलेली झेप बघून अतिशय थक्क व्हायला झाले..कौतुक वाटले.
या कार्यक्रमा मुळे अनेक नवीन मैत्रिणी सावित्री फोरम शी जोडल्या गेल्या,त्यांच्यापर्यंत फोरमचे कार्य पोहोचले, भविष्यात "सावित्री फोरम" त्यांच्या मदतीसाठी नक्कीच पुढे असेल.

सावित्री फोरम तर्फे होणारा शैक्षणिक मदतीचा "विद्यानिधी"हा कार्यक्रम आणि दरवर्षी दिला जाणारा ‘सावित्री’ पुरस्कार हे दोन्ह...
29/06/2025

सावित्री फोरम तर्फे होणारा शैक्षणिक मदतीचा "विद्यानिधी"हा कार्यक्रम आणि दरवर्षी दिला जाणारा ‘सावित्री’ पुरस्कार हे दोन्ही कार्यक्रम 26 जून रोजी उत्तमरित्या संपन्न झाले.
"विद्यानिधी" या कार्यक्रमामध्ये यंदा 80 विद्यार्थिनींना एक वर्षाची शालेय फी शाळेच्या नावाने चेकच्या स्वरूपात देण्यात आली तसेच सियाचिन आणि कुपवाडा येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग युनिट उभारणाऱ्या व सैनिकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सौ. सुमेधाताई चिथडे यांना "सावित्री" पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सुमेधाताईंच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून "सावित्री फोरम" तर्फे चेकच्या स्वरूपात मदतनीधी देण्यात आला.
राष्ट्रीय सर्वोत्तम शिक्षक पुरस्काराचे मानकरी, श्री विद्या विकास सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नामवंत शैक्षणिक सल्लागार मा.श्रीकांत गणपती सुतार हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रोख रुपये ५ हजार, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी "सावित्री फोरम"संस्थेच्या अध्यक्षा.. मोनाली कोद्रे, उपाध्यक्षा..सुप्रिया ताम्हाणे, सचिव.. संयोगिता कुदळे, खजिनदार.. अनिता ढोले पाटील.. पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
सूत्र संचालन अश्विनी बोरुडे आणि शीतल कचरे यांनी तर आभारप्रदर्शन मेघा केवटे यांनी केले.

25/06/2025

सावित्री फोरम तर्फे घेण्यात येणारा "विद्यानिधी" या शैक्षणिक मदतीच्या कार्यक्रमासाठी अजूनही देणगीचा ओघ सुरूच आहे.
आपण केलेले चांगले काम लोकांपर्यंत पोचायला वेळ. लागतो, पण एकदा आपल्या कामाचा सच्चेपणा,त्यासाठी घेत असलेली मेहनत हे लोकांपर्यंत पोचले की त्यांचा आपल्यावरचा विश्वास दृढ होत जातो.
2017-18 सालापासून सुरु केलेल्या या शैक्षणिक मदतीला आता ईतका भरभरून प्रतिसाद मिळतोय की आम्ही अजूनही ज्यांना खरंच गरज आहे अशा प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलींना उद्या मदत देऊ शकतोय..
तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास हिच आमच्या या चांगल्या कामाची खरी पावती आहे.
तुम्हा सर्वांचे खरंच खूप आभारी आहोत, ऋणी आहोत.
तसेच
यावर्षी "सावित्री फोरम" तर्फे दिला जाणारा "सावित्री" पुरस्कार आपल्या देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आपल्याला सैनिकांसाठी सियाचिन येथे ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करणाऱ्या सौ.सुमेधाताई योगेश चिथडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
भारतातली नाही तर जगातली समुद्र सपाटी पासून सगळ्यात उंच असणारी रणभूमी म्हणजे सियाचिन.
ज्या ठिकाणी तापमान उन्हाळ्यात - 35 डिग्री तर हिवाळ्यात - 60 डिग्री इतके कमी असते. अशा ठिकाणी आपल्या सैनिक बांधवांसाठी ऑक्सिजन प्लॅन्ट उभे करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे.
अशा या अशक्य गोष्टीचा ध्यास घेऊन तो तडीस नेणाऱ्या "सावित्री" ला यावर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच त्यांच्याच शब्दात त्यांचे मनोगत,अनुभव ऐकण्यासाठी नक्की या.
26 जून, 5 वाजता, पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरीयम, घोले रोड येथे.
😊कार्यक्रम विनामूल्य आहे. 😊

https://mymarathi.net/m-13688/
20/06/2025

https://mymarathi.net/m-13688/

पुणे- सावित्री फोरमतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘सावित्री’ पुरस्कार यंदा सियाचिन आणि कुपवाडा येथे ऑक्सिजन जनरेशन .....

"सावित्री फोरम" हे नाव केलेल्या छोट्या मोठ्या कार्यामुळे आता बहुतेक सगळ्यांनाच माहिती झाले आहे.या आमच्या "सावित्री फोरम"...
17/06/2025

"सावित्री फोरम" हे नाव केलेल्या छोट्या मोठ्या कार्यामुळे आता बहुतेक सगळ्यांनाच माहिती झाले आहे.
या आमच्या "सावित्री फोरम" मधल्या सगळ्याच सख्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत आणि जिथे जातील तिथे त्या आपला ठसा उमटवत असतात.
सावित्री फोरम मधून मिळणारा आत्मविश्वास, कोणालाही कमी न लेखण्याची वृत्ती,मैत्रिणींकडून मिळणारा पाठिंबा आणि होणारं कौतुक यामुळे च काम करण्याची प्रेरणा मिळत असते.
आज अशाच आमच्या दोन मैत्रिणींनी त्यांच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशा बद्दल "सावित्री फोरम" तर्फे त्यांचे कौतुक, अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला.

सौ.कमल ननावरे
योग शिक्षिका, हिने भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत ब्रॉंझ मेडल मिळवले तसेच
सौ.माधवी खरे हिची महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट् असोसिएशन ची स्टेट मेंबर आणि जालना डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशन ची अध्यक्ष म्हणून निवड झाली असून ती महाराष्ट्रातील स्पोर्ट्स असोसिएशन ची पहिली महिला अध्यक्ष ठरली आहे.
पुनःश्च दोघींचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा..💐

29/05/2025

🙏 _आवाहन_🙏

*सावित्री फोरम* चा एक स्तुत्य उपक्रम...
👩🏻‍🎓 *_विद्यानिधी योजना_*👩🏻‍🎓

नमस्कार..
*"सावित्री फोरम"* ही महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव देणारी अशी संस्था.
गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून त्याला मूर्त स्वरूप देण्यात ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
सामजिक भान ठेऊन सामजिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सांस्कृतिक असे अनेक कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेमार्फत घेतअसतो.
आपल्या समाजात अजूनही मुलींना किंवा महिलांना दुय्यम वागणूक किंवा स्थान दिले जाते ही शोकांतिका आहे.
*सावित्री फोरम* च्या. _विद्यानिधी_ या उपक्रमाअंतर्गत ज्या हुशार आहेत परंतु पैशा अभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही अशा मुलींना शिक्षणापासून वंचित न राहता पुढे शिकता यावे यासाठी नेहमीच मदतीचा हात देते. अशा मुलींचा एक वर्षाचा शाळेचा पूर्ण खर्च धनादेशाच्या स्वरूपात शाळेकडे
सुपूर्द करण्यात येतो.
यावेळी आपल्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते.
यासाठी सावित्री फोरम तर मदत करतेच पण आपल्यासारखे अनेक दानशूर व्यक्ती सुद्धा आम्हाला या कामी भरभरून मदत करतात.
आपल्या सारख्या अनेक दानशूर /देणगीदार लोकांच्या मदतीने आतापर्यंत अनेक मुलींना याप्रकारे शैक्षणिक साहाय्य करता आले आणि त्यामुळे त्यांना वीना आर्थिक अडचण शिक्षण घेता येत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे.
जास्तीत जास्त मुलींना याचा फायदा व्हावा यासाठी
आपणही आम्हाला या चांगल्या कामासाठी हातभार लावावा आणि आपल्याला शक्य तेवढी मदत करावी ही विनंती.कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे *विद्यानिधी* उपक्रमाचे धनुष्य पेलणे आम्हाला अजून सहज आणि सोपे होईल.
हा कार्यक्रम दिनांक 26 जून रोजी 5 वाजता जवाहरलाल ऑडोटोरीयम, घोले रोड येथे होणार आहे.
धन्यवाद.
*सौ. संयोगिता कुदळे,*
*सेक्रेटरी,*
*सावित्री फोरम, पुणे.*

अधिक माहितीसाठी संपर्क.
9921030001
9890795108
9764231911

Bank Details...
Savitri Forum
State Bank Of India.
East Street, Pune.
AC no...35295878794.
IFS Code...
SBIN0003861

Address

Savitri Forum
Pune
411051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savitri Forum,Pune. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category