04/02/2026
पुणे महानगरपालिकेच्या भाजपा गटनेता पदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. गणेशजी बिडकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने लोकाभिमुख, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्य करणारे मा. श्री. गणेशजी बिडकर हे पुणे शहरासाठी एक सक्षम व दूरदर्शी नेतृत्व आहेत. संघटनात्मक अनुभव, प्रशासनावरील मजबूत पकड आणि विकासासाठीची स्पष्ट भूमिका यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाला नवी दिशा व अधिक गती मिळेल, असा ठाम विश्वास आहे.
पुणेकरांच्या गरजा, अपेक्षा आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन शहराचा सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी त्यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरेल. भारतीय जनता पार्टीच्या ध्येय-धोरणांनुसार पुण्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरेल, याबाबत कोणतीही शंका नाही.
त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.!
Ganesh Bidkar
#अभिनंदन