11/03/2021
क्रांतीज्योती सावित्री माई चे पुण्यतिथी दिनी अभिवादन 🙏🙏 जागतीक महिला दिना निमित्त महिला शक्तीचा सन्मान करण्यात आला. पुणे कामगारआयुक्त कर्यालातील सरकारी कामगार अधिकारी श्रीमती तांनुन अत्तर, श्रीमती लता सावंत अधिक्षक (प्रभारी), शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी सौ सुनीता जाधव , करंडे मॅडम, मध्यवर्ती पोलीस काँटोल विभागातील जयश्री मॅडम आणि श्रम यंव जयते महीला बांधकाम संघटना अध्यक्ष योगिता शेंडगे, आनंद आधार संघटना अध्यक्ष सौ अनिता गोरे, बांधकामगर अंगणवाडी बालवाडी संचालिका सौ संगिता गाढे, कामगार कार्यकर्त्या बेबीताई काटकर, आणि असंघटित कामगार क्षेत्रातील महिला कार्यकर्ती चा *भारतीय संविधान प्रास्ताविका* , शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कामगार अन्याय प्रतिकार समिती पुणे चे मा. अध्यक्ष ॲड संतोष म्हस्के , कॉ प्रवीण बराथे, शर्माळे, फरुखभाई पठाण, काकडे, रणजित, विवेक , भीमाशंकर खटावकर आणि ईतर कार्यकर्ते यांचे शुभहस्ते महिलांचा गौरव , सन्मानित करण्यात आले. यावेळी असंघटित क्षेत्रातील अनेक महिला व पुरुषकार्यकरते उपस्थित होते.
या वेळी ॲड संतोष म्हस्के यांनी सांगितले की या सर्व महिला या क्रांतिवीर झाशीच्या राणी आणि सावित्री माईंच्या वैचारिक वारसदार आहेत. समाजात सर्व महिलांच्या प्रती सभ्यता वाढली पाहिजे. प्रत्येक घरातील आई, पत्नी, बहीण, मुली आणि समाजातील स्री वर्गा चां सन्मान प्रत्येक पुरुषांनी केला पाहिजे. केवल कायदा करून पुरेसे होत नाही तर प्रत्येकाने महीलांप्रती सभ्यता वाढीस प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपले सभ्यता पूर्ण आचरण, वर्तन करणे काळाची गरज आहे. सावित्री माई ने महिलांसाठी शक्षणाची गंगोत्री सुरु केल्यामुळेच आजच्या स्री वर्ग सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. म्हणून तुम्हीं उपस्थीत सर्वांनी हा पुढे पुढे च नेला पाहिजे. समाजातील स्त्री यांना जागृति करून एकत्र केले पाहिजे. अन्यायविरुध्द उभे राहिले पाहिजे.
जागतिक महिला दिना चे महत्व हे केवळ ८ मार्च पूर्ते सीमित न रहाता कायमस्वरुपी आहे. न्यूयॉर्कमध्ये ८मार्च १९३० मध्ये महिलांनी दिलेल्या लढ्याच्ये स्वरूप हे महिलांना समान वेतन मिळावे , आणि १९०९ मध्ये मतदानाचा अधिकार महिलांना मिळावा. या लढ्येत शहीद महिलांच्या प्रती आदर व अभिवादन 🙏 स्मरण करावे म्हणून जागतिक संघटना युनो ने १९७५ पासुन ८ मार्च हा जागतिक महिला दिन जगभर साजरा होत असतो. असे विचार सांगून मी मनोगत व्यक्त केले.
त्याचं प्रमाने सन्मानित सर्वच महिला प्रतीनीधिनी बोलताना सांगितले की , पुरुषांकडून हा जो आमचा सन्मान करण्यात आला याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला. १) लता सावंत मॅडम म्हणाले की अम्ही आज या पदापर्यंत पोहचू शकलो याचे कारण आम्हाला शिक्षण घेता आले . आजपर्यंतच्या प्रवासात अनेक खडतर प्रसंगाना आव्हानं तोंड द्यावे लागले आहे. जीवन नकोसे वाटते ऐवढे हाल , आम्हाला सोसावे लागले. घरातील आणि कामाचे ठिकाणचे ताणतणाव होते तेंहा कुटुंबातील पुरुष आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच आजचे हे दिवस पहवायास मिळाले. म्हणून आजचा सत्कार, सन्मान हा पुरुषaकडून होत आहे याचं आम्हाला फार आनंद झाला. २) श्रीमती अत्तार मॅडम यांनी सांगितले की, क्रांतिज्योती सावित्री बाई यांनी शिक्षणाची बीजे या समाजात पेरली म्हणून अजची महीला ही स्वतःचे पायावर उभी राहून स्ववलबी झाली आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. याचं मुळ हे शिक्षण आहे. महिलांना शिक्षित करून त्यांचें हक्क, अधिकाराची जानिव निर्माण करण्यासाठी प्रयत्न शिल राहू यात. पुरुष वर्गाने अशीच सभ्यता सम्पूर्ण महिला प्रती वाढविली तर स्री पुरुष असा भेदभाव कमी कमी होत जाईल. आज ही महिला कामगारांना पुरुष्याप्रमाने समान वेतन साठी लढावे लागते. या साठी जागृती निर्माण करू यात. अश्या सतकारमुळे आमचे मनोबल वाढले . आनंद व्यक्त केला.
३)पोलिस अधिकारी यांनी सांगितले आमची लढाई ही ईतर सरकारी नोकरीपेक्ष वेगळी आहे. आम्हाला केंव्हा ही तत्काळ कर्तव्य डुटी करावी लागते. वेळेचे बंघन नसते. Sangharsgymay जीवन जगावं लागतं. पुरुषप्रधान संस्कृती चां आम्हाला अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. संघर्षमय जिवन आम्हाला जगावे लागते . अश्या वेळी तुमच्यासारखे काही पुरुष वर्गाकडून जो सन्मान केला जातो तेंवहा पुनः आनंदाचे ओलावा असावा असे मनभरून येते. संविधानची प्रास्ताविक देहुन जो सत्कारकेला तो खूपच मनाला आनंददेणाराआहे. माणसाचे संपुर्ण जीवन सार आहे. जीवनाच्या या लढाईत पुढे जाण्याची उमेद निर्माण होते. यावेळी योगिता शेंडकर, अनिता गोरे, संगीता गाढे आणि अनेक महीला कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केलीत.
यावेळी अनेकांनी आपले अनुभव सांगताना रडणे अनावर झाले होते.
प्रास्ताविक रणजित चव्हाण यांनी केले. कॉ. प्रविण बरथे यांनी सत्कार सन्मानित झाशीच्या राणीचे आणि उपस्थीत सर्वांचे आभार मानले. जय संविधान . जय. सावित्री 🙏🙏🙏