27/05/2025
"13(2) नोटीसला उत्तर देणे का अत्यंत आवश्यक आहे? एक कर्जदार म्हणून तुमचा कायदेशीर हक्क जपा!"
कर्जाचे हप्ते थकले, आणि तुमचे खाते ‘NPA’ झाले…
त्यामुळे तुम्हाला बँक किंवा फायनान्स कंपनीने SARFAESI कायदा 2002 अंतर्गत कलम 13(2) ची नोटीस पाठवली असेल.
ही नोटीस संपत्ती गमावण्यापूर्वीचा अखेरचा संधीवजा इशारा असतो.
याला केवळ दुर्लक्ष करणे म्हणजे आपली मालमत्ता, व्यवसाय, शेती, घर, सन्मान... सर्व काही गमावण्याची शक्यता.
---
म्हणूनच 13(2) नोटीसला उत्तर देणे का गरजेचे आहे?
1. उत्तर ही तुमची कायदेशीर ढाल आहे
ही नोटीस केवळ इशारा नाही, तर तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची अंतिम संधी आहे.
आपण जर योग्य कायदेशीर उत्तर दिलं, तर पुढील टप्प्यात बँकेची कारवाई न्यायालयात आव्हान देता येते.
2. उत्तर दिल्याशिवाय पुढे लढता येत नाही
SARFAESI कायद्याच्या कलम 17 अंतर्गत DRT (डेब्ट रिकव्हरी ट्रायब्युनल) मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी, तुम्ही आधी 13(2) नोटीसला उत्तर दिलेले असणे आवश्यक असते.
उत्तर न दिल्यास तुमचा अर्ज DRT मध्ये बाद होण्याची शक्यता!
3. बँकेला तुमचा प्रस्ताव मांडता येतो
उत्तराद्वारे तुम्ही पुनर्गठन, One Time Settlement (OTS), हप्त्यांची पुनर्संरचना, किंवा अन्य कायदेशीर उपाय मांडू शकता.
हा संवाद पुढील जप्ती/लिलाव थांबवण्यास मदत करू शकतो.
4. बँक/फायनान्सच्या चुकीच्या कारवाईला आव्हान देता येते
जर 13(2) नोटीसमध्ये खोटे दावे असतील, अनियमित हिशोब दाखवले असतील, किंवा नियमांची पायमल्ली केली असेल – तर ते उत्तरामध्ये दाखवून योग्य पुराव्यासह नोंदवता येते.
5. वेळेत उत्तर न दिल्यास काय होते?
बँक तुमच्या मालमत्तेवर कब्जा घेऊ शकते
लिलाव जाहीर केला जातो
पोलिस संरक्षणासह प्रत्यक्ष ताबा घेतला जाऊ शकतो
तुमच्या व्यवसायावर/शेतीवर वाईट परिणाम होतो
आणि सगळ्यात महत्त्वाचे – न्यायालयात लढण्याची तुमची संधी कमजोर होते!
For more details contact us on
070303 74777
Adv Amarnath Sakhare and Associates.