20/11/2023
नोंदणी व मुद्रांक विभाग
महाराष्ट्र शासन
दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिक येथे आधुनिक व सुरक्षित स्टॅम्प पेपर जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्टॅम्प ड्युटी भरण्याच्या विविध पद्धती विकसित करण्यासाठी एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात महाराष्ट्राचे प्रभारी नोंदणी महानिरीक्षक श्री. नंदकुमार काटकर साहेब, इतर राज्यातील नोंदणी खात्याचे प्रतिनिधी, चलार्थ पत्र मुद्रणालय नाशिक येथील अधिकारी, C-DAC, Data Centre, Govt Of India, SPMCIL येथील उच्च पदस्थ अधिकारी सामील झाले.
अधिक माहितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in
या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागाच्या सारथी हेल्पलाईनला संपर्क करा – ८८८८००७७७७.