14/02/2026
18 वर्ष सोबत राहताना अनेक अनुभवातून पती पत्नीचे नाते कसे समृद्ध होते हा अनुभव घेता आला.
एकमेकांना समजून घेऊन संसार करणे, जबाबदारी सांभाळून एकमेकांना वेळ देणे, प्रेम निभावणे, एकमेकांचा सन्मान करणे, चुका झाल्यास समजून घेणे, व वेळोवेळी कौतुक करून प्रोत्साहन देऊन जगण्यातील उत्साह वाढविणे, असे बरेच काही या 18 वर्षात जमले, सुट्टीत कधी खूप सारी मौजमस्ती तर भरपूर सारे कोर्टात काम करणे जमले.
कधी धावपळ तर कधी सुट्टीत मस्त निवांत जगणे असे मनसोक्त आयुष्य जगताना मन कधी सामाजिक तर कधी अध्यात्मिक कामातही रमून गेले.
18 वर्षात अनेक प्रसंगात माझ्या पंखांना बळ मिळाले ते िशाल_बर्गे यांच्या विचारांमुळे, #खरी_स्त्री_पुरुष_समानता_प्रत्यक्ष_अनुभवता आली ती त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे, एखादी स्त्री यशस्वी होते ते पतीच्या खंबीर पाठिंब्याने, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाने भरलेला असावा, व भविष्य उज्वल करावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या ॲड. विशाल बर्गे यांना लग्नाच्या 18व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
077190 50353