Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Sadashiv Peth
  • Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
Call Directions Website

Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

https://youtube.com/channel/UC2nhkCzzJkTUZyCDtGZLDAw जय जिजाऊ... जय शिवराय...!!

24/09/2026
चातुर्यवर्ण व्यवस्था, विचार आणि वर्चस्वाला नकार देत, छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी य...
24/09/2026

चातुर्यवर्ण व्यवस्था, विचार आणि वर्चस्वाला नकार देत, छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला.

हा सोहळा केवळ धार्मिक विधी नव्हता; तो तत्कालीन सामाजिक-धार्मिक व्यवस्थेला दिलेला चोख उत्तर होता. शिवरायांचा विचार स्पष्ट होता—राज्य कोणत्याही वर्णाच्या मक्तेदारीसाठी नव्हे, तर रयतेच्या,बहुजनांच्या कल्याणासाठी!!

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!🚩

जय जिजाऊ !
जय शिवराय !!

- Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

24/09/2026

Dharashiv | तुम्हीच शेतकरी काय म्हणत आहे बघा... खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांऐवजी फडणवीसांच्या दौऱ्यात केवळ नेते पुढारी आणि कार्यकर्त्यांचाच जास्त भरणा दिसत आहे. स्क्रिप्टेड दुष्काळी दौऱ्याची चित्तरकथा!

मराठवाड्याला दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला बांधावर आर्थिक मदत करावी... संभाजी ब्रिगेडची राज्य स...
24/09/2026

मराठवाड्याला दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला बांधावर आर्थिक मदत करावी... संभाजी ब्रिगेडची राज्य सरकारकडे मागणी...

23/09/2026

*मुख्यमंत्र्यांनी दुष्काळात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला "थेट बांधावर आर्थिक मदत करावी..." - संभाजी ब्रिगेड*

धाराशिव चा जिल्हा दौरा पर्यटन दौरा होऊ नये... - ॲड. संतोष शिंदे

मराठवाड्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाने उद्ध्वस्त झाला आहे शेतातलं पीक पूर्णतः नष्ट झालेल आहे. जळून गेलेला आहे, संपूर्ण पीक पिवळ पडलेला आहे. अशा स्थितीत सरकार अजूनही गंभीर नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धाराशीवचा पर्यटन दौरा म्हणून करू नये. शेतकऱ्यांना पंचनामेची वाट न पाहता थेट बांधावर मदत करण्याची प्रशासनाला आदेश द्यावेत... अन्यथा फक्त प्रसिद्धीचा दौरा होईल अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट बांधावर मदत करावी... अशी संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, सरकारला तशी विनंती आहे.

- ॲड. संतोष शिंदे,
प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

23/09/2026

अल्पवयीन मुले व महिलेला बेदम मारहाण... 🏴

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कात्रज-कोंढवा रोडवर गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या छोट्या दुकानावर कारवाई होत आहे, इथपर्यंत ठीक आहे परंतु या मनपाच्या अमोल लावंड या अधिकाऱ्यांने आणि कॉन्ट्रॅक्ट द्वारे असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी *महिलेला उचलून नेण्याचा किंवा त्यांच्या मुलांना पकडून ठेवण्याचा किंवा गाडीत बसवण्याचा अधिकार काय?* याच लोकांनीअठरा वर्षाखालील दोन मुला मुलींना अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली.

महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी असून सुद्धा त्याने या लोकांना पकडण्यासाठी प्रायव्हेट पिवळ्या रंगाची गाडी वापरली जी महानगरपालिकेची नाही त्याच्यावर कुठलेही नाव चिन्ह नाही अशा पद्धतीची दादागिरी पुण्यामध्ये सर्रास सगळीकडे सुरू आहे आणि सर्वसामान्य माणसांकडून त्या ठिकाणी त्यांचं नुकसान करून पैसे उकळण्याचे व हप्ते घेण्याचे प्रकार सुरू आहेत.

गाडीमध्ये सुद्धा या मनपा कर्मचाऱ्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली? मारण्याचा संबंध काय?

गौरी कांबळे नावाची महिला फुलाचा छोटासा हार बनवून विकण्याचा व्यवसाय करते. तिला जर अशी दिवसाढवळ्या मारहाण होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त, पुण्याचे खासदार, पुण्याच्या महापौर व पुणे पोलीस आयुक्त यांना विनंती की, तात्काळ चौकशी करून... *मनपा अधिकारी गुन्हे दाखल करून निलंबीत करा...*

संभाजी ब्रिगेडच्या वतिने जाहिर निषेध...

- ॲड. संतोष शिंदे,
प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

23/09/2026

Siya Goyal second marriage | पोरीनं फसवलं आणि केतन अग्रवाल चा जीव घेतला...

https://youtu.be/SofWtCPfc3k?si=y3ogVMRiO7mK6WUqखरी वस्तुस्थिती काय? नक्की पहा...👇👇
23/09/2026

https://youtu.be/SofWtCPfc3k?si=y3ogVMRiO7mK6WUq

खरी वस्तुस्थिती काय? नक्की पहा...👇👇

गरब्याच्या नावाखाली मुली मिळणार भाड्याने? 😡 | Rent Navratra garaba ...

https://youtu.be/VIgNK9Dn6IE?si=tJ8_UMLhriEMoibvखरीमाहिती? नक्की पहा...👇👇
23/09/2026

https://youtu.be/VIgNK9Dn6IE?si=tJ8_UMLhriEMoibv

खरीमाहिती? नक्की पहा...👇👇

Ketan Agrawal Murder | सिया गोयल एक नंबरची फसवी निघाली? | Santosh S...

Address

Sadashiv Peth

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share