Adv. Vaibhav R. Gargade

Adv. Vaibhav R. Gargade BSL. LL.B, DCL., D. E-Com., DTL., LL.M. ADVOCATE, HIGH COURT- MUMBAI.

10/10/2024
12/10/2021
31/05/2021

#दानशूर_केनिया

केनियाने भारताला 12 टन धान्य मदत म्हणून पाठवले. बरेच भारतीय ह्या छोट्याश्या मदतीची #थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर
एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात म्हणजे
"मसाई"!

मसाई लोकांपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याच्या बातमीसाठी कित्येक महिने लागले. आपल्या गावाजवळील जवळच्या गावात राहणाऱ्या आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा त्यांनी मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.

एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली दबून इतकी माणसे मरू शकतात हे झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी सर्व अविश्वसनीय होते. परंतु तरीही त्यांना अमेरिकी लोकांचे दुःख वाटले आणि त्याच वैद्यकीय विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवण्यात आले. त्यांनी ते पत्र वाचले.
विल्यम ब्रॅंगिक प्रथम विमानात चढले. काही काळ हवाई प्रवास आणि मग तिथून त मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा मोडक्यातोडक्या वाटेने प्रवास करत ते तेथे पोहोचले.

गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत 14 गायी घेऊन ते अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. मसाईसच्या एका वडिल माणसाने गाईचा दोर त्या उपप्रमुखांच्या हातात देऊन एका फलकाकडे निर्देश केले. त्या फलकावर काय लिहिले होते ते तुम्हाला माहिती आहे?
त्यावर लिहिले होते -
"या दु:खाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत".
होय, ते पत्र वाचल्यानंतरच, जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या राजदूताने चौदा गायींचे दान गोळा करण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास पार केला होता.

पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधन !
या दोन्हीमुळे त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतुन एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोचली, तर मग काय घडले हे तुम्हाला माहिती आहे?

त्यांनी आभूषणांच्या जागी गायी स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षर्य करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या आभूषणे ठेवू नयेत.
मग अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.

कृपया १२ टन धान्याकडे पाहू नका ते स्वीकारा. ते तुलनेने कमी असेलही कदाचित परंतु दान नव्हे, दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पाहा.

लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा.

- राजीव शुक्ला यांच्या मूळ हिंदीतील लेखाचा जमेल तसा अनुवाद!

Rahul Suryakant Boke ह्यांची पोस्ट

04/03/2021
28/10/2020

Address

Mumbai

Telephone

+918600520620

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Vaibhav R. Gargade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category