18/06/2017
दरवर्षी पंढरीत प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संतांच्या पालख्यांची मांदियाळी हजारो-लाखो वैष्णवांसह निघते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहचते.
एकात्मतेची शिकवण देणाऱ्या वारीची ही वाट संतानी दाखविली; जी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्रित मार्गक्रमण करीत असते. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे.