Nitin Nimbalkar

Nitin Nimbalkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nitin Nimbalkar, Lawyer & Law Firm, baramati, Baramati.

07/09/2024

मंदी बेरोजगारी नोटबंदी GST के जन्मदाता, स्मृति ईरानी के इकोनॉमिक्स के टीचर, एंटायर पोलिटिकल साइंस की डिग्री धारक महान वैज्ञानिक, राडार स्पेशलिस्ट, 1987 में डिजिटल कैमरा ईमेल इन्वेंटर के गुरु को शिक्षक दिवस की सुभकामनाएँ !!

07/09/2024

१६६५ साली पुरंदरच्या तहात औरंगजेबाने शिवरायांकडून २३ किल्ले हिसकावून घेतले होते... आणि इथेच औरंगजेबाच्या विनाशाची सुरूवात झाली होती.

छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका त्या काळी जेवढी गाजली आजही तेवढीच जनमाणसात रुजलेली. गाजावी अशीच थरारक ती सुटका.संभाज...
07/09/2024

छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका त्या काळी जेवढी गाजली आजही तेवढीच जनमाणसात रुजलेली. गाजावी अशीच थरारक ती सुटका.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला चेव चढला आणि रायगडाच्या भिंतीला मोंगल चिकटले.
येसूराणींच्या धीरोद्धात निर्णयाने राजारामांना रायगड सोडावा लागला आणि खाली खोल कर्नाटकात जिंजीपावेतो दौड मारावी लागली.
शिवरायांच्या आग्रा मोहिमेसारखीच प्रचंड थरारक अशीच ही मोहीम, जेवढी थरारक तेवढीच दुर्लक्षित.
रायगड ते जिंजीच्या ह्या मोहिमेतल्या एका घटनेनं अंगावर शहारा आणला, जीव ओवाळून टाकावा इतका अतर्क्य- शिवकाळाला साजेसा असाच तो प्रसंग.
सतर्क मोंगली सेनेला हूल देत राजारामांचा प्रवास सुरु असताना वाटेत अनेकांनी त्यांची वाट अडवली तर बिदनूरच्या चन्नम्मा सारख्या राणीनं मोंगलांशी वैर पत्करून राजारामांना मदत केली.
बिदनूर ओलांडून राजाराम तुंगभद्रेच्या तीराला लागले. तुंगभद्रेच्या पात्रात एका छोटेखाणी बेटावर त्यांनी रात्रीचा मुक्काम टाकला पण त्याची खबर विजापूरचा सरदार सय्यद अब्दुलखानाला लागली आणि अचानक त्याने त्यांच्या मुक्कामावर छापा मारला.
चहुओर गिल्ला उडाला, ढाल-तलवारी भिडल्या, राहुट्या मोडल्या, नदीच्या प्रवाहानं लाल रंग ल्याला, अनेक मराठे कैद झाले. ( इथे सापडलेल्या मराठयांना विजापुरात कैद करून ठेवलं होतं.
ह्यातल्या काहींनी पळून जायचा पर्यंत केला पण तो फसला आणि त्यांच्यापैकी ८० लोकांची बादशाही फर्मानाप्रमाणे हत्या करण्यात आली. )
ह्यात राजारामही सापडले. हातात शस्त्र, अंगावर शाही वस्त्रे, डोक्यावर तसंच पागोटं आणि पायात पादत्राणं. मराठयांचा राजा सापडला, आता मराठे लढणार ते कोण्याच्या भरोश्यावर? सय्यद अब्दुलखान बेभान झाला.
बादशाही मुक्कामाच्या दिशेने हरकारे दौडले, "मराठयांचा राजा सापडला." अशी खबर घेवून. हा आनंद फार थोडा वेळ टिकला.
राजाराम म्हणून ज्याला पकडलं ते राजाराम नव्हतेच. हल्ला झाला त्यावेळी त्यांची वस्त्र अंगावर चढवलेला त्याच्याच चणीचा दुसराच कोणीतरी मावळा होता तो.
राजारामांसाठी- मराठयांच्या राजासाठी स्वतः कैद स्वीकारली त्या पठ्यानं.
राजारामांचा वेश घेवून मोंगली सैन्याला त्या मावळ्यांनं भुलवलं आणि तोच वेळ राजाराम महाराजांना त्या ठिकाणापासून दूर जाण्यासाठी निर्णायक ठरला.
जगावेगळ्या मुशीतून घडलेली माणसं होती ही. बेदरकारपणे जीव ओवाळून टाकायची,
भौतिक सुखाचे अळणी हिशोब न मांडता.
काय दिलं होतं छत्रपती शिवरायांनी ह्यांना.
पैसा- अडका, जमीनजुमला की खिलती? ह्यातलं काहीच नाही.
दिलं होतं तर स्वातंत्र आणि सुराज्याचं स्वप्न,
स्वप्न पूर्ण करण्याची हृदयात उर्मी आणि मनगटात ताकद.
मराठयांना उपकारात सोडून जाणार्या ह्या मावळ्याबद्दल इतिहास आजही अबोल आहे.
पुढे कधी बोलेल की नाही ह्यावरही प्रश्नचिन्हच आहे.
माहिती संकलन :- बोम्बल्या फकिर

07/09/2024
03/09/2024

औरंगजेब, अकबर हे भारतीय राजे नसून हा देश लुटायला आलले दरोडेखोर आणि हा देश बाटवायला आलेले धर्मगुरू होते … हे संकट होते हिंदुस्थानावले जे आपल्याला पेलता आले नाही . शिवराय आणि महाराणा प्रताप सोडल्यास सर्वांनी तलवारी म्यान केल्या …
हा हिंदुस्थानचा काळा इतिहास आहे.

25/08/2024

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर 1680 च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.
तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (1689) चा हा केवळ नऊ वर्षांचा काळ महत्त्वाचा आहे.”
“अवघे तेवीस वर्षांचे वय. औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती. मात्र त्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर केवळ स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली. त्या नऊ वर्षांच्या काळात त्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तर संवर्धनही केले. स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.
राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे तख्तही ते काबीज करू शकले असते.
ही कामगिरी “केवळ अद्‌भुत’ म्हणता येईल अशीच आहे. जगात त्याची तुलना होऊ शकत नाही.
उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह वा माघार नसलेल्या 240 लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक), मद्रास (मदुराई), पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),
पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या. खजिना दुप्पट केला.
शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला. नऊ वर्षांत 240 लढाया करणारे युवराज संभाजीराजे दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर असत.
त्यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले.
स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला.
नवी गावे बसवली. व्यापारी पेठा बसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले.
आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली.
लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली.
वाटते तेवढे सोपे नाही. अद्‌भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.”
“संभाजीराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली, की मुअज्जम आणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याची व्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदत करण्याचे धाडसदेखील केले नाही. उलट संभाजीराजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली.
मोगलाईला धोका होता म्हणून…
“”मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व शाह्या या बादशहांच्या होत्या. स्वराज्याचा प्रयोग भारतभर पसरण्याचा धोका होता

24/07/2024

बजेट आले आणि गेले
महाराष्ट्र कोरडाच

24/07/2024

स्वायत्त राज्याची मागणी हा देशद्रोह असू शकतो

आज शिवजयंती..ज्यांनी स्वराज्य उभा करायला,रयतेला अन्यायाविरुद्ध उभा रहायला आणि लढायला शिकवलं त्यांची जयंती.जाती-धर्म या प...
19/02/2024

आज शिवजयंती..
ज्यांनी स्वराज्य उभा करायला,रयतेला अन्यायाविरुद्ध उभा रहायला आणि लढायला शिकवलं त्यांची जयंती.
जाती-धर्म या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कोष्टकांपलीकडं माणसं जोडली.मावळे या शब्दात स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूरांची मोट बांधली.
शिवरायांचे सर्वसमावेशक विचार सध्याच्या राज्यकर्त्यांना आचरणात आणायला बराच वेळ गेलाय.जाती-धर्मापालिकडे विकास,सुबत्तेसाठी आणि रयतेच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या राज्यकर्त्यांना शिवराय आशीर्वाद देतीलच.
आणि लोकांना सुबत्तेची स्वप्न दाखवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या जातींची आणि धर्माची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारे रसातळाला जातील एवढं नक्की.
जय शिवाजी.. जय भवानी..

13/02/2024

Business is a serious affair, Don’t do it for fun or just bcoz others are doing
व्यावसायिक आयुष्य जितके सोपे, चकचकीत दिसते तसे ते नक्कीच नसते

20/12/2023

People don' t change. You just get to know them better

24/08/2021

जिंदगी में पीछे देखोगे तो अनुभव मिलेगा
जिंदगी में आगे देखोगे तो आशा मिलेगीै

Address

Baramati
Baramati
413102

Telephone

+917350066993

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Nimbalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share