अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,विदर्भ प्रदेश , शाखा अमरावती

  • Home
  • India
  • Amravati
  • अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,विदर्भ प्रदेश , शाखा अमरावती

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,विदर्भ प्रदेश , शाखा अमरावती To provide legal aid to needy clients , guide upcoming lawyers , provide necessary material for preparing for competitive examinations of judicial offices .

 #गिलहरीसायोगदान   संपुर्ण महाराष्ट्रातच विशेषत: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित आपल्या बांधवांच्या साठी अल्पसा म...
01/11/2025

#गिलहरीसायोगदान

संपुर्ण महाराष्ट्रातच विशेषत: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित आपल्या बांधवांच्या साठी अल्पसा मदतीचा हात म्हणून अधिवक्ता परिषदेच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अमरावती येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सहायता निधी साठी रू.२,११,०००/- चा सहायता निधी सुपूर्द करण्यात आला.

18/05/2021

*माझ्या जिवाभावाच्या सर्व सहकारी वकील बंधु भगिनींनो व माननीय वरीष्ठगण,*
नमस्कार !
या कोरोना महामारी मुळे जवळपास मागील वर्षभरापासून म्हणजेच मार्च-२०२० पासून कोर्टाचे नियमित कामकाज जवळपास बंद आहे आणि त्यामुळे आपल्या वकिली व्यवसाय करणाऱ्या मुख्यत्वाने First Generation Lawyers ना फार अडचणींना तोंड देत आहेत.
कोरोना ची दुसरी लाट आल्यानंतर तर परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे.
येणाऱ्या काळातली अनिश्‍चितता लक्षात घेऊन, जिल्हा न्यायालयाचे कामकाज व त्यातील सर्वसामान्य वकील बंधू-भगिनींचा सहभाग वाढावा, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावेत या उद्देशाने, मी, माननीय बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठा समक्ष स्वतःहून दखल घेतलेल्या PIL क्रमांक ४/२०२० मध्ये दोन सिव्हील अप्लिकेशन्स दाखल केले होते. *त्यापैकी एक अर्जान्वये सर्व जिल्हा व तहसील न्यायालया मधील कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरू करण्यात यावे अशी विनंती केली होती.*
काल झालेल्या सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने मी केलेली विनंती/प्रार्थना ग्राह्य धरून विदर्भातील अकराही जिल्हा न्यायालयात अशा प्रकारे कामकाज सुरु होण्या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत व एका आठवड्यात रिपोर्ट ही सादर करण्यास सांगीतले आहे.
मला विश्वास आहे की अशाप्रकारे सुरू होत असलेल्या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून होणाऱ्या कामकाजामुळे/सुनावणी मुळे आपल्या सर्व वकील बंधू-भगिनींना प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी निश्चितच मदत होईल, *तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे प्रकरणांची सुनावणी होणार असल्यामुळे आपणा सर्वांच्या आरोग्यासही काही बाधा येणार नाही.*
तसेच *महिला वकीलां ना सुद्धा घरून वा ऑफिस मधून प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होऊन आपली प्रकरणे मार्गी लावण्यास मदत होऊ शकेल असा मला विश्वास आहे.*
ऑनलाईन पद्धतीने चालणारे कामकाज ही काळाची गरज आहे व प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्यास मदतरुप असणार आहे. अशाप्रकारे या कोरोना महामारी मुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊन च्या परिस्थितीत आपणा सर्वांना निश्चितच मदतरुप राहणार आहे.
*काल झालेल्या सुनावणीत माझ्या वतीने वरीष्ठ विधीज्ञ मा. श्री अनील मार्डीकर सर यांचे सह अॅड् श्री अरुण अग्रवाल सर, अॅड् श्री कुणाल नालमवार व अॅड् श्री कार्तिक शुकुल यांनी बाजु मांडली.*
धन्यवाद !
काळजी घ्या !
सुखरुप रहा-सुरक्षित रहा !
लवकरच पुन्हा एकदा प्रत्यक्षात भेटु
:-
*अॅड् पारिजात पांडे*
सदस्य
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा

शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम।अयोध्यकजनमुक्तित राम, विधिमुख विविधानन्दक रामजय श्री राम ॥ 🙏
05/08/2020

शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम।

अयोध्यकजनमुक्तित राम, विधिमुख विविधानन्दक राम

जय श्री राम ॥ 🙏

28/07/2020

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अमरावती शाखेकडून मा. मिरा ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Address

Balaji Plot , Rajapeth
Amravati
444605

Telephone

+919405884040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,विदर्भ प्रदेश , शाखा अमरावती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,विदर्भ प्रदेश , शाखा अमरावती:

Share

Category