Sadguru Enterprises Talegoan Dhamdhere

Sadguru Enterprises Talegoan Dhamdhere All types legal Document Making & Registration & Online Stamp duty & Ragitation Fess Chalan available here.

03/01/2023

शेती खरेदी-विक्री मध्ये असणारे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदे।। या कायद्यांचे महत्व, अटी, शर्ती याबद्दल महत्वपूर्ण व .....

23/12/2022

जमीन, मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय ? ।। बक्षीस पत्र रद्द करता येते का?।।बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भ.....

23/12/2022

जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो? आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही? admin October 15, 2020 5 शेती, शैक्...

03/04/2019
13/05/2018

‼अनधिकृत घरे किंवा प्लॉटची यापुढे रजिस्ट्रीच होणार नाही, शासनाचा निर्णय‼

राज्यातील नागरी क्षेत्रातील अनधिकृत इमारती अथवा प्लॉटिंगची समस्या रोखण्यासाठी नगरविकास विभागाने धाडसी निर्णय घेत अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. यानुसार ३ मे २०१८ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले असून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विविध प्राधिकरणांना आपल्या क्षेत्रातील अधिकृत, अनधिकृत बांधकामांची वॉर्डनिहाय माहिती दुय्यम निबंधकांकडे देण्याची सक्ती करण्यात आली आहे. अशा अनधिकृत मालमत्तांची नोंदणीच निबंधकांनी करून घेऊ नये, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व विकास प्राधिकरणांनी गट क्रमांक व विकासकांच्या नावासह अनधिकृत मालमत्तांची (बांधकामे व इतर) माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी व त्यासंबंधी वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्धी द्यावी, असे परिपत्रकात सूचित आहे. फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ कायद्यातील ५२, ५३, व ५४ तसेच महानगरपालिका अधिनियम २६०, २६७, २६७ (अ) आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

फसवणूक टळणार : विकासकांकडून बांधकामासंबंधी पुरेशा परवानग्या न घेताच मालमत्ता विक्री केल्या जातात. या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली जाते. तेव्हा नागरिकांना खरेदीची मालमत्ता अनधिकृत असल्याचे समजते. ही फसवणूक आता टळेल.

अशा असतील उपाययोजना
१) स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास प्राधिकरणे आपल्या क्षेत्रात असलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्तांची यादी त्या विभागाच्या संकेतस्थळावर टाकतील. अनधिकृत मालमत्तांच्या यादीस स्थानिक वर्तमानपत्रात ठळक प्रसिद्धी द्यावी लागेल.
२) अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची नोटीस संबंधित विकासक अथवा मालमत्ताधारकांवर बजावल्यानंतर तत्काळ कोर्टात कॅव्हेट दाखल करावे लागेल. जेणेकरून पुढील कारवाईस स्थगितीसाठी प्राधिकरणांची बाजू भक्कम राहील.
३) दुय्यम निबंधकाकडे अशा अनधिकृत मालमत्तांची माहिती नोंदवून रजिस्ट्री करण्यात येऊ नये, असा सूचना देण्याचे निर्देश.
४) न्यायालयात ज्या प्रकरणांमध्ये स्थगिती आदेश आहेत अशा प्रकरणात स्वत: हजर होऊन नागरिकांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे ही बाब ठळकपणे मांडावी.
५) ज्या अधिकाऱ्याच्या वाॅर्ड अथवा प्रभागात अनधिकृत बांधकामे सुरू असतील अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर २ मार्च २००९ च्या कायद्यानुसार दोषी धरून कारवाई करण्यात येईल.

घर अथवा प्लॉट खरेदी करताना लोक जीवनाची पुंजी लावतात. अशा अनधिकृत विकासकांना चाप बसावा म्हणून प्रभावी अंमलबजावणी हवी.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/before-confirming-your-transaction/articleshow/64115029.cm...
11/05/2018

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/before-confirming-your-transaction/articleshow/64115029.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=homeloan110518

तुमचा व्यवहार पक्का करण्यापूर्वी before confirming your transaction परवडणाऱ्या घरांचे धोरण अस्तित्वात आल्याने आम्ही खूप जास्त आभारी ...

हे तेलंगणा  मघ्ये होऊ शकते  महाराष्ट्रात  का नाही?
10/05/2018

हे तेलंगणा मघ्ये होऊ शकते महाराष्ट्रात का नाही?

Address

SADGURU ENTERPRISES TALEGOAN DHAMDHERE TAL SHIRUR DIST
Pune
412208

Telephone

9860205307

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadguru Enterprises Talegoan Dhamdhere posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category