21/11/2024
उशिरा ची पोस्ट
#कृती महत्त्वाची, फक्त दिखाऊपणा नाही.
मी १९ तारखेला गावी जातांना, एक कोर्ट कामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एका कोर्टात गेलो होतो. जात असताना जालना पासून पुढे माझ्या गाडीत निवडणूक कर्मचारी बुथ वर जात होते. माझी बँग बघुन मी पण त्यांच्या सारखाच निवडणूक कर्मचारी आहे का ? विचारलं. पण मी नाही सांगुन डोळे बंद करून बसलो, कारण मुंबई ते जालना प्रवास केल्यामुळे थकलो होतो. मध्येच कुठेतरी हे बाबा गाडी मध्ये चढले. पण गाडीत जागा नसल्याने उभे होते. एक शिक्षकास विचारले, "थोडं सरकता साहेब ! मला उभे राहता येत नाही". तर त्या शिक्षकाने आजुबाजुला बघीतले आणि "दुसरीकडे जागा बघा" म्हणून सांगितले. हे सांगणारे मराठी शुद्ध बोरनारे शक्यतो मराठी ग्रस्त असावेत ( तसं सांगता येणार नाही). हा संवाद ऐकताच माझ्या बाजूला बसलेले मुस्लिम समाजातील शिक्षक पटकन उठले आणि त्यांच्या जागेवर बाबांना बसविले. बाबा खूप वयस्कर जवळपास ८० वर्षे वयाचे असतील. त्यांना खूप छान वाटले जागा दिल्यामुळे ( मला झोप लागली नव्हती पण या सर्व प्रक्रिया मी डोळे बंद करून ऐकत होतो तेव्हढ्यात बाबांनी मला थोड सरकुन दोन शिटवर त्या शिक्षकाला पण जागा दिली. मला थोडा त्रास झाला. पण त्या दोन्ही व्यक्ती म्हणजे हे बाबा आणि मुस्लिम शिक्षक यांच्या बद्दल खूप आदर निर्माण झाला. माझ्या मनात शब्द होते पण त्यांना बोललो नाही कारण मला वाटले मी त्यांना हे लक्षात आणून देणे योग्य नाही. त्याच असंच बिना ओळखीची एकमेकांना दाखलेले प्रेम, मनावता जपावी बोलुन ती अनुभूती खराब करू नये. बस मधुन उतरल्यावर बोलव वाटले पण तो पर्यंत ते आदरणीय व्यक्ती, शिक्षक निघून पण गेले.
शेवटी जात, धर्म, वय, रंग काही परिणाम नाही करत तर तुमची मानसिकता, मानवतावादी विचार खुप काही करुन जाते.
काही लोक अशा घटनांची भांडवल करतात पण अशी खुप लोक आहेत ते खर्या अर्थात मानवता जगतात. ते बोलून पण दाखवत नाहीत. काही तरी छान करुन निघून पण जातात.
(सदर फोटो घेण्याचा प्रयत्न केला तोही त्यांना न कळता त्यामुळे ते शिक्षक व्यवस्थीत आले नाहीत)
अँड. प्रभाकर रणशूर, मुंबई