Pralhad Bhise Patil

Pralhad Bhise Patil journalist

29/01/2026

दादा जातीचा होता म्हणून नव्हे;तर सामान्य जनतेच्या मदतीचा पुढाकार म्हणून खंत वाटते. असा नेता या कलयुगात होणे नाही. नाहीतर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणारे राजकारणी पावलो पावली दिसून येतात.

१४ जानेवारी – मराठा शौर्य दिवस 🚩🚩 मराठा शौर्य दिवसाला मानाचा मुजरा 🚩१४ जानेवारी १७६१ रोजीपानिपत येथे मराठा साम्राज्याचे ...
14/01/2026

१४ जानेवारी – मराठा शौर्य दिवस 🚩
🚩 मराठा शौर्य दिवसाला मानाचा मुजरा 🚩

१४ जानेवारी १७६१ रोजी
पानिपत येथे मराठा साम्राज्याचे युद्ध
अहमदशहा अब्दालीविरुद्ध झाले.

या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला,
पण मराठ्यांचे शौर्य, धैर्य आणि स्वाभिमान कधीच संपले नाहीत.

#पानिपत हा शेवट नव्हता,
तो होता पुन्हा उभे राहण्याचा #संघर्ष.

#पराभव पचवून,
थोड्याच काळात मराठ्यांनी
दिल्लीवर पुन्हा आपला #झेंडा फडकवला.

👉 म्हणूनच
१४ जानेवारी = पराभव नव्हे, मराठा शौर्याची आठवण
#मराठा #शौर्य #दिवस

जय जिजाऊ
11/01/2026

जय जिजाऊ

09/01/2026
*समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलला आग; ३६ प्रवासी सुखरूप – मोठा अनर्थ टळला*मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर म...
06/01/2026

*समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलला आग; ३६ प्रवासी सुखरूप – मोठा अनर्थ टळला*
मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच वेळीच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३००.१ येथे नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, मलकापूर पोलीस केंद्र अंतर्गत समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड येथे रात्रगस्त पेट्रोलिंग सुरू असताना CRO संभाजीनगर यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली की चॅनल क्रमांक ३००.१ (मुंबई कॉरिडोर) येथे एका ट्रॅव्हलला आग लागलेली आहे. ही माहिती मिळताच API संदीप इंगळे, HC ९९८, HC १२१४, PC १९१४, PC ५२३ तसेच एम.एस.एफ.चे दोन जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रॅव्हल क्रमांक MH 40 CT 8043 (खुराणा ट्रॅव्हल) ही रस्त्याच्या कडेला जळत असल्याचे दिसून आले. सदर ट्रॅव्हलचे चालक वाहिद शेख (वय ३६, रा. नागपूर) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ट्रॅव्हलच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. सदर ट्रॅव्हल नागपूर येथून नाशिककडे जात होती. वाहनामध्ये एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते.
आग लागल्याची बाब लक्षात येताच चालक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षितरित्या बाहेर काढले. कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
अपघातानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सरकारी वाहन MH 28 C 6367 द्वारे दुसरबीड टोलनाक्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.
ही घटना मेहकरजवळील शिवणी पिसा गावालगत समृद्धी महामार्गावर घडली असून, वेळेवर मदतकार्य व पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

01/01/2026

नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा‼️

नवे स्वप्न, नवी उमेद आणि नवी दिशा घेऊन येणारे हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, समृद्धी व यश घेऊन येवो.
आपल्या सर्वांच्या अपेक्षा व आकांक्षा पूर्ण होवोत, हीच सदिच्छा.

प्रल्हाद भिसे पाटील
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान मेहकर संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार

#नववर्षाभिनंदन #नववर्ष२०२६ #शुभेच्छा #नवीनसंकल्प

*मतदार व उमेदवारातील नैतिकता;नेत्यांची घराणेशाही**गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकारखडल्...
28/12/2025

*मतदार व उमेदवारातील नैतिकता;नेत्यांची घराणेशाही*

*गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकारखडल्या गेल्या होत्या, मात्र मा. न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वप्रथम नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र अनेक ठिकाणी आरक्षणाचे वाद व उमेदवाराची छाननी, सदस्य अपात्रतिशी संबंधित न्यायालयीन याचिका प्रलंबित होत्या, त्यामुळे या प्रकरणातील काही मतदारसंघातील निवडणुका २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आल्या; त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावरच निकाल जाहीर करणे आवश्यक असल्यामुळे दोन्ही टप्प्यांची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला पार पडली, मात्र यावेळी मतदारांची व उमेदवारांची अनैतिकता जगासमोर आली तर घराणेशाहिच्या मर्यदेचा बांध फुटला, नागरिकांनी आपली चन-चन मोठ्या प्रमाणावर दूर करून घेतली तर उमेदवारांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर पूर्ण करून दिली. यामुळेच देणारे व घेणाऱ्यांच्या अनैतिकतेने लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.*

*निवडणुकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीत चालणारी म्हणणाऱ्यांना चपरा, देवाणघेवाण आता उच्च,शिक्षित, प्रतिष्ठेची अंमलबजावणी करण्याच्या ( काही सोडलेतर ) घराघरा पर्यंत पोहचली तर झोपडपट्टी फक्त बदनाम आहे? खरतर गेल्या तीन-चार वर्षांपासून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,जिल्हापरिषद, पंचायत समित्यावर प्रशासक कार्यरत आहे, मात्र या काळात नागरिकांच्या प्रत्यक कामे झाली, तर विकास थांबला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना सत्तेचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर लोकशाही आणणे, जनतेच्या गरजा " शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते " पूर्ण करणे स्थानिक भागात विकासाची गंगा आणून लोकशाहीत जगण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी एक माध्यम आहे, मात्र आता या निवडणुकीत परिस्थिती हळू हळु बदलून या नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत युवकांची फळी धाब्यावर नंगा नाच, तर गल्लीबोळ्यात मद्यपेय व देवाण-घेवाण आचारसहितेत लोकशाही धिंडवडे उडवत, तर मतदानदिनी सुद्धा मतदान केंद्राच्या बाजूला देवाण-घेवानीचे अड्डे लोकशाहीला जिवंतपणी मरण यातना देत होते.*

*यासर्व घडामोडीत घराणेशाहीच पूर्वीपासून भारतीय

*महाराष्ट्र देशा वेळ आली आहे.**वेळ आली आहे. आता बहुजन समाज बांधव, नेते, विरोधक सर्वांनी एकदा समोर येऊन गेल्या ४० वर्षांप...
29/08/2025

*महाराष्ट्र देशा वेळ आली आहे.*

*वेळ आली आहे. आता बहुजन समाज बांधव, नेते, विरोधक सर्वांनी एकदा समोर येऊन गेल्या ४० वर्षांपासून व शेकडो बांधवांच्या बलिदानाने रक्तरंजित झालेल्या आंदोलनाला पूर्णविराम देण्याची. आता न्याय द्यायचं काम करावे. आजी-माजी सर्व विधानसभेचे सदस्य, खासदार, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री सर्व मंडळींनी समोर येऊन न डगमगता यासाठी प्रयत्न करावा तळागाळातील बहुजन समाजाची ही विनंती आहे, गेल्या अनेक वर्षां पासून मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पाठीराख्याचे काम करत असताना, आज त्यांच्या लेकरा बाळांवर दैनंदिन जीवनात उपासमारीची व गरिबीची वेळ आली आहे, यामध्ये काही लोक खूप मोठे असतील सुद्धा, मात्र जास्त प्रमाणात गरिबीने त्रासलेले आहेत, या लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून अठरा पगड १२ बलतीदारांमध्ये आपल्या झोळीत काहीतरी*

*आमदारकी खासदारकी किंवा जलदआर्थिक सक्षम होण्यासाठी द्वेष पसरवून काही समाजकंटक भांडण लावून देण्याचे काम करत आहेत, हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला आहे, हे अतूट नातं जे शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर उभे आहे, हे नियमित चालण्यासाठी आपण सर्व बहुजन बांधवांनी सुद्धा समोर यावे. जेणेकरून गाव गाड्या पासून ते महाराष्ट्रभर हे अतूट नातं पहिल्यासारखं विश्वासाने भरलेल राहावं व प्रत्येक माणसाला आपला माणूस म्हणून मदतीचा हात नेहमीप्रमाणे एकमेकांना मिळावा व या भारत वर्षात एकमेव असलेला आपलं समृद्ध राज्य ज्यांनी देशभरात धर्माचे व माणुसकीचे रक्षण केले, देशाचे रक्षण केले, माय माऊलींचे रक्षण केले. त्या सर्व बहुजन, १८ पगड १२ बलुतेदार शिवरायांच्या मावळ्यांचे राज्य समाजातील काही स्वार्थी माणसांमुळे*

*विस्कटून जाऊ नये याची जबाबदारी घ्यावी व प्रत्येकाला लोकशाही मार्गाने न्याय मिळावा, प्रत्येकाच्या मुलाला समानता मिळावी, त्याला आपल्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात अन्याय झाल्याप्रमाणे वाटू नये. असं हे समतेचे राज्य पुन्हा एकदा दुरुस्त व्हावं यासाठी सर्वांनी पुढे येण्याची वेळ आता आली आहे, साकारात्मकविचाराने व आपल्या महापुरुषांचेविचार मोठ्या मनाने पुढे ठेवून समोर येण्याची आज गरज आहे. आज नाहीतर कधीच नाही. जे गरीब गरजवंत लोक आज जीवाची बाजी लावून हुतात्मा पत्करून गेल्या ४०

*हरवत चालली स्वतंत्र्यातील लोकशाही**लोकशाही म्हणजे स्वतंत्र, अलंकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार, सन्मान तर माणसाला म...
18/08/2025

*हरवत चालली स्वतंत्र्यातील लोकशाही*

*लोकशाही म्हणजे स्वतंत्र, अलंकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार, सन्मान तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा खरा अधिकार, स्वातंत्र्यापूर्वी असलेली हुकूमशाही काडीमोड करण्यासाठी देशभरातील आंदोलकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या अनेक नवयुवकांच्या हुतात्म्याने व पावलोपावली जीवाचं रान करून उभे राहिलेले हे स्वातंत्र्य ( लोकशाही ) निर्माण झालं आहे, याची भूल पडल्यासारखे आज आपलेच ( काही ) भ्रष्ट राजकारणी,अधिकारी, मोठे उद्योजक व आर्थिक धनदांडगे असलेले मान्यवर गल्ली बोळापासून तर दिल्लीपर्यंत " जिसके हाथ में लाठी उसकी म्हैस " या हुकूमशाहीतील म्हणी प्रमाणे वावरतांना समाज जीवनात वावरत आहे. आजच्या या सोशल मीडियाच्या युगात फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटरच्या माध्यमातून समाज जीवनातील छोट्या मोठ्या घटना अन्य अत्याचाराच्या घटना ज्या पहिले समोर येत नव्हत्या त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात.*

*त्याचबरोबर या माध्यमातून विवो वाढवण्यासाठी किंवा लाईक मिळण्यासाठी त्यामधून पैशाची मिळकत व्हावी म्हणून अभिविचारी लोकशाहीत स्वातंत्र्याच्या नावावर वाटेल तसे अंग प्रदर्शन, विषारी विचारांचा शिरगाव होत आहे, यामुळेच नवीन पिढी बिघडली आहे? असे प्रश्न जुने लोक उपस्थित करत आहे. पिक्चर व टीव्ही सिरीयल च्या माध्यमातून बिघडलेलं हे काम आता अँड्रॉइड मोबाईलच्या दुनियेतून घरोघरी कधी पोहोचल कळाल सुद्धा नाही. खूप मोठ्या प्रमाणावर चांगले काम होत असताना, मात्र यामुळे दुष्परिणाम सुद्धा तेवढेच निर्माण झाले आहे. मायबापाने कष्टाने कमवून दिलेलं शंभर टक्के स्वातंत्र्य लेकरांना आंधळ बनवत आहे. चिकाटीने व स्वाभिमानाने जगत आलेले कुटुंब आज लेकरांच्या व्यसन, वाईट सवयी व मनानेच लग्न करण्याच्या या चलनामुळे विखरले जात आहे. येणाऱ्या काळात याचा भस्मासुर अनेकांच्या आयुष्याची राख रांगोळी करणार यात शंका नाही. आज दिवसभरात एकंदरीत हाणामारी, पळवापळवी, फसवाफसवी, राजकारणातून, दोन नंबर धंद्यातून श्रीमंतीची शिडी जलद मार्गाने चढण्यासाठी लागलेली स्पर्धा व त्यांना समर्थन देणारी मुख्यमंडळी सर्व काही असून सुद्धा एक दिवस हरणार आहे. याची मात्र शंका वाटत नाही.*

#विदर्भमतदार #फेसबुक

*श्रीमान रायगडावर लादलेला दुर्दैवी वाघ्या*अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज अतिशय जुलमी क...
31/03/2025

*श्रीमान रायगडावर लादलेला दुर्दैवी वाघ्या*

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज अतिशय जुलमी काळात एका मोठ्या घराण्यात जन्मालाआले आपलं आयुष्य आयशोआरामात जगले असते, मात्र जगभरात हजारो वर्षाच्या सन्मानाच्या परंपरेत जगनारा भारत, सुसंस्कृत, स्वाभिमानीआणि विविध धर्म,पंत,जातीपाती तसेच विविध बोलीभाषेने नटलेल्या व संगनमताने, सहकार्याने, गुण्यागोविंदाने जगत असलेले समुदाय, आपल्या मातृभूमीत,कर्मभूमीत प्रत्येकाच्या अस्मितेवर, देव, धर्मावर, मनुष्याच्या मूलभूत अधिकारावर, लेकी बाळींच्या स्वतंत्र्यावर आलेल्या चारही बाजूच्या संकटात जीवाची व कुटुंबाची परवा न करता अठरापगड, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन ' ' स्वराज्याची ' ' मुहूर्तमोड रोवत या मातृभूमीसाठी आपल्या जीवाची बाजी लावत हजारो लाखो मावळ्यांनी हुतात्म पत्कारले त्यावर हे स्वराज्य उभ ठाकल, पूर्वजांच्या इतिहासातून जगभरात एक मिसाल निर्माण झाली मात्र दुर्दैव आहे. की छत्रपतींनी सर्वांना एकत्र करून मानवतेच्या दुश्मनांना इथेच गाडले पण आज शेकडो वर्ष उलटून सुद्धा एकता निर्माण न होता वर्चस्ववादाचे व राजकारणाचे बळी ठरत वैयक्तिक स्वार्थासाठी अफजलखानासारखी आपल्यातीलच प्रवृत्ती इथे वारंवार जन्म घेत आहे, याचाच प्रत्यय वारंवार शिवचरित्राबद्दल किंवा कथा, कादंबऱ्या, नाटके, लिखाण, वादग्रस्त विधानाच्या कृतीतून दिसून येते.

गोष्ट आहे अनैतिकतेवर उभा असलेला वाघ्याची, वाघ्या आता ८९ वर्षाचा झाला आहे, १९२५ दरम्यान श्रीमान रायगडांच्या छायाचित्रात नसलेला वाघ्या १९३६ मध्ये जन्माला आला, १९२६ साली पुण्यातील काही मंडळीनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीच्या पुनरजीर्णोद्धाराचे काम हाती घेतले व पूर्ण झाले. पण कुत्र्याचा पुतळा त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९३६ साली तिथे बसविला गेला. राजसंन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारल्याचे बोलले जाते हे तेच नाटक आहे ज्या नाटकाने सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून त्यांच्या चारित्र्यावर डाग लावले. वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याच्याबद्दल जी दंतकथा सांगितली जाते, त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केले, त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना त्यांच्य

Address

Mehkar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pralhad Bhise Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pralhad Bhise Patil:

Share